चौथ्या दिवशी पैठणचा पाणीपुरवठा सुरळीत सुरू

Foto
पैठण, (प्रतिनिधी) : पैठण नगर परिषदेच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाईपलाईनचे टेस्टिंग करताना जास्त दाब आल्याने बसवेश्वर चौक परिसरातील पाईपलाईन उघडली होती. उखडलेल्या पाईपलाईनचे काम व वॉल बसवण्याचे काम युद्ध पातळीवर करण्यात आले त्यामुळे चौथ्या दिवशी पैठण शहराचा पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे.

पैठण शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत उखडलेली पाईपलाईन जोडण्यात यश
पाईपलाईनचे काम पूर्ण झाले. भरणा पाईपलाईन जोडण्याचे काम रविवारी ते मंगळवार पर्यंत पूर्ण करण्यात आल्याने पैठण शहराला तीन दिवस पाणीपुरवठा होऊ शकला नव्हता. दरम्यान भरणा
पाईपलाईन जोडणीचे काम पूर्ण झाल्यानंतर चाचणी घेण्यासाठी पाणी सोडण्यात आले परंतु पाण्याचा दाब जास्त असल्यामुळे नवीन काम जागोजागी उघडले. या नादुरुस्त झालेल्या पाईपलाईनचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले असून नवीन पाईपलाईनवर दोन व जुन्या पाईपलाईनला एक वाल्स जोडण्यात आले. 

सायंकाळी उशिरापर्यंत ते काम पूर्ण झाल्याने चौथ्या दिवशी बुधवारी मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी पैठण शहराला पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाला आहे. पाणी पुरवठा विभागाचे व्यंकटी पापुलवार, नवगिरे, आदींनी पाईपलाईनचे काम पूर्ण करण्यास परिश्रम घेतले या ठिकाणी नगराध्यक्ष सौ. विद्या भूषण कवसानकर, उपनगराध्यक्ष तुषार पाटील, नगरसेवक सुनील रासने, महेश मुंदडा, ईश्वर दगडे, शेखर शिंदे, जालिंदर अडसूळ यांनी या ठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी केली.